लोह पुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त करजकुपा ग्रामपंचायत तर्फे जिल्हा परिषद शाळेत कोराना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला
कोविंड 19 या महामारीच्या संकटात जीवाची परवा न करता घरदार विसरून जनतेस अभिप्रेत असलेला खरा मानवताधर्म जागृत करून कोरोनाशी लढा देणारे व आलेल्या संकटाला न घाबरता त्याच्याशी ताठ मानेने लढण्याची जिद्द ठेवणारे करजकुपा गावातील कोव्हीड योद्धे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करजकुपा गावा मार्फत करण्यात आला सदर सत्कारार्थी पुढील प्रमाणे करजकुपा उपकेंद्रातील सी एच ओ डॉअमित पटेल आरोग्य सेवक हितेश सुगंधी आरोग्य सेविका सिंधू वळवी व आरती वळवी आशा कार्यकर्ती कोकिळा ठाकरे व माया समुद्रे तसेच ग्रामपंचायतचे श्री बुला भाऊ चौधरी व राजू चौधरी या कोव्हीड योद्ध्यांचा सत्कार करज कुपा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला याप्रसंगी सरपंच भिला भाऊ ठाकरे उपसरपंच दशरथ भाई चौधरी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बुद्धरभाई पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर भाई चौधरी ग्रामपंचायत सदस्य जगन ठाकरे ग्रामसेविका निशा बडगुजर मुख्याध्यापिका शुभांगी गोसावी सहशिक्षक सुनील भदाणे व रवींद्र साळुंखे अंगणवाडी सेविका आशा चौधरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी गावातील कोरोना योद्धांचा गौरव करण्यात आला |
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री सुनील भदाणे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संयोजन अंगणवाडी सेविका आशा चौधरी,देवकन्या पाटील, मीना पाटील , मदतनीस आशा पेंढारकर मीना पाटील , माया सामुद्रे श्री सुनील भदाणे श्री रवींद्र साळुंखे यांनी केले आभार मुख्याध्यापिका सौ शुभांगी गोसावी यांनी मानले.
0 Comments