हज़रत मुहम्मद पैगंबर दिनानिमित्त चिराग गल्ली मोहल्ला पंच कमेटी तर्फे गरजू व गरीब हिंदू मुस्लिम बांधवांना व मातांना अन्न व ब्लँकेट वाटप
चिराग गल्ली मोहल्ला नंदुरबार पंच कमिटी तर्फे हज़रत मुहम्मद पैगम्बर दिनानिमित्त (ईद ए मिलाद) हिन्दू मुस्लिम बंधवाना,मातांना अन्न व कंबल वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी पवित्र कुराण चे आयतीचे दाखले देऊन इस्लाम धर्माच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एकात्मता,सदभाव व बंधुता तसेच शांतीचा संदेश दिले. त्याच बरोबर पैगंबर साहेब यांचे जीवनचरित्र व त्यांच्या कथनांचे आधारे इस्लाम धर्मामध्ये सत्क्रमांचे महतव लोकांना पटवून दिले.
सदर कार्यक्रमात पैगंबर साहेब यांचे संदेश लिहिलेल्या स्टिकरानचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ए.पी.आय. ड्युटे साहेब,,जाकीर मियां जागीरदार (नंदुरबार राष्ट्रवादी कांग्रेस जिलाध्यक्ष) निर्मल जैन, आनंदा बाबूराव माळी,(माळी समाज अध्यक्ष) मोहन रायभान माळी,माजी नगर सेवक,माणिक मोतीराम माळी( बिजेपी जिल्हाध्यक्ष नंदुरबार) निलेश माळी(नगर सेवक न.पा.नंदुरबार) जे.के.पार्क चे किस्मत सेठ,इकबाल मेंबर, फारूक मेमन (नगरसेवक न.पा.नंदुरबार) जमियतचे अध्यक्ष मौलाना जकरिया,सय्यद रफत हुसैन(जिल्हाध्यक्ष एम.आय.एम.नंदुरबार) हाजी अल्ताफ मेमन,सय्यद जैनुद्दिन चाचा,हाजी मुबीन खान,हाजी बाबू भाई मेमन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरिफ मिस्त्री, सय्यद बाकिर मियां जहागीरदार,सय्यद मुतीबर, जहागीरदार, सलाउद्दीन मिस्त्री अकबर दादा साइकिल वाला अजहर मियां, आसिफ पठाण,जब्बार दादा, पठाण अमजद, सय्यद शाहबाझ अली,हाफिज मुशर्रफ,बिलाल मियां,सद्दाम शेख जब्बार,जहांगीर खान कौसर खान,अब्दुल गफ्फार मंसूरी, सर कुरैशी अब्दुल रहीम सर,यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्र संचालन नासिर मुबिन खान सर यांनी तर आभार प्रदर्शन हाजी अनिस मेमन यांनी केले
0 Comments