स्वच्छता साक्षरता अभियान-२०२० कार्यशाळा संपन्न
महात्मा गांधीजीच्या १५१ जंयतीनिमित्त २ ऑक्टोंबर २०२० साली नाबार्ड चे महाराष्ट्र क्षेत्रिय कार्यलयाने स्वच्छेते विषयक जनजागृती करण्यासाठी, वर्तुणूकीत बदल घडवून आणण्यासाठी आणि या क्षेत्रात संस्थात्मक कर्ज पुरवठेच्या संधी विषयी जागृकता निर्माण करण्यासाठी स्वच्छता विषयक साक्षरता मोहिम राबविण्याचा कार्यक्रम सुरु केलेला आहे.
संपूर्ण भारत भर हे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. व या मोहिमेमध्ये २ ऑक्टोंबर २०२० ते २६ जानेवारी २०२१ च्या दरम्यान संपूर्ण देशात २००० कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आणि त्यामध्यमातून १ लाख लोकांपर्यंत पोहचण्याचा मानस नाबार्ड चा आहे.
या अभियनाची सुरवात नंदुरबार जिल्हामध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या माध्यमातून पहिला कार्यक्रम हा तळोदा तालुक्यातील मोड या ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात अॅड.सिमा वळवी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदुरबार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक श्री.प्रमोद पाटील जिल्हा विकास प्रबंधक नाबर्ड व प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच श्री.जयसिंग गायकवाड, श्री.गिरासे, महाराष्ट्र बँकेचे शाखा प्रबंधक श्री.प्रितेश बागले, जिल्हा मध्यवर्तीचे विभागीय प्रबंधक, शाखा व्यवस्थापक, व श्री.लक्ष्मण खोसे प्रकल्प व्यवस्थापक लुपिन फाऊंडेशन आदि उपस्थित होते.
या प्रसंगी नाबार्डच्या वतीने हे अभियान नविन स्वरुपात कशा पध्दतीने आले आहे, या विषयी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक यांनी माहिती सादर केली. त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान हे आपल्याकडे चालू असून या अभियनामार्फत देशाभरामध्ये स्वच्छतेविषयी व ग्रामीण/शहरी भागामध्ये टायलेट बांधणीमध्ये महत्वाची भूमिका या अभियानाची होती. तसेच भारत व महाराष्ट्र राज्य हे हगणदारी मुक्त असुन नाबार्डच्या माध्यमातून भारत सरकारने स्वच्छता विषयक साक्षरता निर्माण करणे, तसेच भविष्यामध्ये स्वच्छतेविषयी ओडीएफ -२ ला पांठिबा देऊन आपल्या बांधकामामध्ये काही त्रुटी असल्यास स्वच्छतेसाठी बँके फायन्सासच्या माध्यमातून आपल्याला मदत करेल. व या मदतीच्या माध्यमातून आपण आपल्या संडास मध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुर करुन स्वच्छ भारत मिशन हे ख-या अर्थाने कसे सार्थक ठरेल असे मत मांडले.
अॅड.सिमा वळवी (जिल्हा परिषद अध्यक्षा) - या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी देखील उपस्थित महिलांशी संवाद साधला. व टायलेट वापरत नसल्यामुळे किंवा किरकोळ दुरुस्ती अभावी जर महिलांना वापरता येत नसतील तर या अभियानाच्या माध्यमातून महिलांनी आपले स्वच्छता गृह व्यवस्थित करुन घ्यावे, तसेच नाबार्ड च्या वतीने आरोग्य स्वच्छता याविषयी प्रबोधन करुन जनतेच्या वर्तुणूकीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी भर दिला आहे. सामाजिक पायाभुत विशेष स्वच्छतेसाठी बँक फायन्सासच्या माध्यमातून ओडीएफ-2 ला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत मोड व लुपिन फाऊंडेशनच्या मदतीने परीश्रम घेण्यात आले. यासाठी मोड येथील महिला, स्वयं सहाय्यता गट, ग्रामसंघ यांनी मोलाची कामगिरी बजावली व आप की जय या कलापथकाच्या माध्यमातून लोकांना स्वच्छ भारत अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली. ह्या प्रकारच्या अभियानास गती देऊन सर्वांच्या मदतीने यशस्वी करण्याचे ठरले.
0 Comments