खान्देश बालवक्ता 2020 चा निकाल जाहीर श्रुती सदगीर प्रथम, निकिता पाटील द्वितीय, तर श्रुतिका पाटील तृतीय ...
नंदुरबार (प्रतिनिधी) लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांना वक्तृत्वसाठी विचारमचं उपलब्ध करत मातोश्री बहुउद्देशिय संस्था (धमाणे) नंदुरबार व त्रिरत्न गृप पिंप्री , जि .जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश बालवक्ता (ऑनलाईन ) 2020 राज्यस्तरीय महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेत आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धे साठी सद्य स्थितीत ज्वलंत विषय देण्यात आले होते. त्यात
- ऑनलाईन शाळा कशी शिकशील रे बाळा
- माझा बाप शेतकरी
- संविधान ओळख काळाची गरज
- मी सावित्रीबाई फुले बोलतेय
- पाऊस हसवणारा पाऊस रडवणारा या विषयांचा समावेश होता.
खान्देश सहित महाराष्ट्र भरातील जळगाव ,नासिक, धुळे, नंदुरबार ,सोलापूर, कोल्हापूर, परभणी, बुलढाणा, अमरावती, जालना, मुंबई, पुणे,औरंगाबाद ,अकोला,सांगली ,पालघर. व बहुतांश जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
यात स्पर्धकांनी घवघवीत यश मिळवले विजेते खालील प्रमाणे
- प्रथम - क्षृती ज्ञानेश्वर सदगीर
- दृतीय- निकिता बालाजी पाटील
- तृतीय - श्रुतिका शिरीष पाटील .
उत्तेजनार्थ
वक्तृत्व स्पर्धेत एकूण 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेचे परीक्षण प्रा. नरेंद्र गायकवाड. सौ. छाया अजय पाटील. उगलाल शिंदे, शिवदास माळी. या मान्यवरांनी केले. तर प्रमोटर म्हणून सचिन पाटील. व्याख्याते तथा कवी. दिपक मोहिते. गोरखनाथ गोसावी.सुरेश पाटील. यांनी काम पाहिले.
संयोजन समिती तथा आयोजक टीम कडून कमलाकर मोहिते व सतिश शिंदे यांनी सर्व स्पर्धक , पालक त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व प्रोत्साहन देणारे श्रवण करणारे श्रोते यांचे आभार मानले. व नवीन स्पर्धांचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले.
0 Comments