बॅनरबाजीकरून शहरवासीयांची दिशाभूल करणार्‍याच्या निषेध :माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी

बॅनरबाजीकरून शहरवासीयांची दिशाभूल करणार्‍याच्या  निषेध :माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी

 

पत्रकार परिषदेत बोलतांना  माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी 

 नंदुरबार: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जे सभागृहात घडल नव्हत त्या संदर्भात बॅनरबाजीकरून शहरवासीयांची दिशाभूल करणार्‍या भाजप प्रवृत्तीचा निषेध करून शहरविकासाला साथ द्या,अशी आग्रही भुमिका माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना घेतली. शहरातील मालमत्ताकरा संदर्भात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ताधारी अन् विरोधी पक्षातील कलगीतुराबाबत चंद्रकांत रघुवंशी यांनी चौफैर समाचार घेतला. यावेळी बोलतांना रघुवंशी म्हणाले की, सलग चार वेळा आणि २० वर्षापासून नगराध्यक्ष पदावर विराजमान असलेल्या सौ. रत्ना रघुवंशी यांच्या कार्यकिर्दीत नंदुरबार शहराचा कायापालट झाला. याच बरोबर विकासाच्या दृष्टीने नगरपालिकेच्या माध्यमातून जनहिताची कामे वेगाने करण्यात आली. मात्र गढुळ राजकारण करीत भारतीय जनता पार्टी विनाकारण जनसामान्यांमध्ये दिशाभूल करण्याच्या प्रयत्न सुरू आहे.  

                                            

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात नगरपालिकेच्या गाळ्यांच्या भाडेमाफीचा निर्णय घेणारी नंदुरबार पालिका राज्यातील एकमेव नगरपरिषद ठरली आहे. सुट आणि माफी यात फरक असून मालमत्ताकर माफीचा अधिकार नगरपालिकेस नाही. ऑनलाईन चाललेल्या सर्वसाधारण सभेत भाजपाचे एकही नगरसेवक बोलले नाही. मात्र प्र्रसिध्दीच्या हव्यासापोटी शहरात बॅनरबाजी करण्यात आली. कोरोनामुळे फेरमुल्यांकन करणार नसल्याचा निर्णय देखील नगराध्यक्षांनी घेतला. परंतु अंजिठ्यावर नसलेल्या विषयांवर विरोधकांनी पोळी शेकली आहे. निवडणूकीनंतर जनतेस वेठीस धरण्याची प्रवृत्ती आमच्यात नसल्यामुळे इतरांप्रमाणे दादागिरी करून जमिनी बळकावल्या नसल्याचा टोला मारीत चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. शेवटी बोलतांना रघुवंशी म्हणाले की, कोरोना काळात लुटीचा फंडा आत्मसात करून अनेकांनी आपला मुख्य व्यवसाय बदलून कोविड रूग्णालय निर्मितीस प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी उपस्थित होते. प्रसार माध्यम प्रतिनिधींना आ. रघुवंशी यांच्यातर्पे १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे चित्रीकरण देखील दाखविण्यात आले.


१६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे चित्रीकरण

Post a Comment

0 Comments