ग.तु.पाटील महाविद्यालयातील जी.एस.टी. सर्टिफिकेट कोर्सच्या एप्रील 2020 च्या परिक्षेत दिव्या महाजन प्रथम
नंदुरबार दि.२३-कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ जळगावच्या एप्रील २०२० च्या माल व सेवा कर (GST) प्रमाणपत्र परिक्षेत ग.तु.पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात कु. दिव्या महाजन हीने 300 पैकी 288 गुण मिळवून ओ ग्रेड ,प्रिती मालवे हीने ३०० पैकी २८६ गूण मिळवून ओ ग्रेड तर देवेश तांबोळी या विद्याथ्यांने ३०० पैकी २७५ गुण मिळवून ओ ग्रेड प्राप्त केली आहे.
सदर परीक्षेत २८ विद्यार्थी होते पैकी १३विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ए ग्रेड मिळविणारा पुष्पराज काळे, ए प्लस मिळविणारे पंकज खैरणार व मुकेश पाटील तर ओ ग्रेड प्राप्त करणारे अन्य विद्यार्थी खुशबु भावसार , तेजस्विनी भावसार, नंदकिशोर कुटे, गणेश मराठे, देवर्श शहा, बलोच फरहान बानो व खुशबु राठोड हे आहेत.सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा.श्री.मनोजभैय्या रघुवंशी महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. व्ही.एस. श्रीवास्तव,डॉ. एम.एस. रघुवंशी, उपप्रचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी,डॉ. आर.आर. कासार, विभाग प्रमुख प्रा.व्ही.एम. अहिरराव, प्रा. एस.टी. मोरावकर, प्रा.के.एस.शर्मा, समन्वयक प्रा.डॉ.एन.बी.गोसावी यांनी अभिनंदन केले आहे .


0 Comments